G-PZND2NBDJ8
श्री खंडोबा देवस्थान , अणदूर - नळदुर्ग : संपर्क ७३८७९९४४११ ... Shri Khandoba Devasthan, Andur-Naldurg: Contact 7387994411

अणदूर - मैलारपूर येथील श्री खंडोबा हे अनेकांचे कुलदैवत आहे.सोलापूर पासून ४० कि.मी. व तुळजापूर पासून ३० कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. श्रीची मुर्ती अणदूर येथे सव्वा दहा महिने तर मैलारपूर ( नळदुर्ग ) येथे पावणे दोन असते.

.

अणदूर - मैलारपूर येथील श्री खंडोबा हे अनेकांचे कुलदैवत आहे.सोलापूर पासून ४० कि.मी. व तुळजापूर पासून ३० कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. श्रीची मुर्ती अणदूर येथे सव्वा दहा महिने तर मैलारपूर ( नळदुर्ग ) येथे पावणे दोन असते.

.

श्री खंडोबाचे अणदूरकडे प्रस्थान

आज एका अनोख्या आणि श्रद्धापूर्ण सोहळ्याचे साक्षीदार होण्याचा योग आला आहे. श्री खंडोबाची मूर्ती आज मैलारपूर (नळदुर्ग) येथून अणदूरकडे प्रस्थान करीत आहे. ही घटना केवळ धार्मिक स्थलांतर नसून, दोन गावांमधील एकात्मता, भक्ती आणि परंपरेचे प्रतीक आहे.अणदूर आणि मैलारपूर (नळदुर्ग) ही दोन गावे जरी वेगवेगळी असली तरी त्यांना जोडणारा दुवा आहे तो म्हणजे श्री खंडोबा. दोन्ही गावांमध्ये श्री खंडोबाची मंदिरे आहेत, परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोन्ही मंदिरांमध्ये एकच मूर्ती आहे जी वर्षभर दोन्ही गावांमध्ये विभागून ठेवली...

श्री खंडोबा: दोन मंदिरे, एक मूर्ती, अतूट भक्ती - एक अनोखी परंपरा

महाराष्ट्राच्या धाराशिव जिल्ह्यात, अणदूर आणि नळदुर्ग या दोन गावांमध्ये, एक अशी अनोखी परंपरा जिवंत आहे जी केवळ धार्मिक श्रद्धेचेच नव्हे तर सामाजिक ऐक्य आणि सहिष्णुतेचेही एक अद्वितीय उदाहरण मांडते. ही परंपरा आहे श्री खंडोबा, महादेवाचा अवतार मानल्या जाणाऱ्या दैवताची, ज्यांची एकच मूर्ती दोन मंदिरांमध्ये वर्षभर विभागून ठेवली जाते. नळदुर्ग ते अणदूर: ऐतिहासिक प्रवासश्री खंडोबाची ही कथा नळदुर्गच्या भुईकोट किल्ल्यापासून सुरू होते, जिथे त्यांची स्वयंभू मूर्ती सापडली असे मानले जाते. नळ-राजा आणि त्यांची...

अणदूरची श्रावण परंपरा: खडी रविवारचा अनोखा उपवास

 श्रावण महिना हा भगवान शिवाच्या भक्तीचा महिना. या पवित्र महिन्यात देशभरात श्रावण सोमवारचे व्रत केले जाते, पण धाराशिव जिल्ह्यातील अणदूर गावात मात्र श्रावण महिन्याच्या शेवटच्या दोन रविवारांना 'खडी रविवार' हा अनोखा उपवास केला जातो. ही परंपरा येथील श्री खंडोबाच्या देवस्थानाशी निगडीत आहे.अणदूर हे गाव श्री खंडोबाचे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. श्री खंडोबा हा महादेवाचा अवतार असल्याने श्रावण महिन्यात येथे खंडोबाची विशेष पूजा-अर्चना केली जाते. दोन पुजारी चार किलोमीटर अंतरावरून चालत कावडीने पाणी...

अणदूर ते नागझरी: एक अतूट श्रद्धेची परंपरा

 अणदूरचे श्री खंडोबा मंदिर हे केवळ एक जागृत देवस्थान म्हणूनच नव्हे, तर एक अतूट श्रद्धेच्या आणि परंपरेच्या प्रतीक म्हणूनही ओळखले जाते. या मंदिराची ख्याती केवळ श्री खंडोबा हा महादेवाचा अवतार असल्यामुळेच नाही, तर येथे जपल्या जाणाऱ्या अनेक विधिपूर्वक परंपरांमुळेही आहे. त्यांपैकी एक म्हणजे श्रावण महिन्यात श्री खंडोबांना नागझरी येथील होमकुंडातील पाण्याने अभिषेक करण्याची प्रथा.नागझरी हे मैलारपूर (नळदुर्ग) श्री खंडोबा मंदिराजवळच असलेल्या एका डोंगरात वसलेले आहे. येथील होमकुंडातील पाणी वर्षभर गरम राहते,...

अणदूरच्या श्री खंडोबाचे सिंहासन चांदीचे होणार

नाशिकचे कारागीर परेश कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी दीड महिन्यात काम पूर्ण करणार अणदूर - तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री खंडोबाचे सिंहासन बदलण्यात आले असून, हे सिंहासन चांदीचे करण्यात येत आहे. त्यासाठी ३५ किलो चांदी लागणार असून २५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हे काम नाशिकचे कारागीर परेश कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी करणार आहेत. श्री खंडोबा - बाणाई विवाहस्थळामुळे अणदूर येथील श्री खंडोबा तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे. या खंडोबाच्या दर्शनासाठी  संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश...

श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी बालाजी मोकाशे

सचिवपदी सुनील ढेपे यांची फेरनिवड अणदूर - तुळजापूर तालुक्यातील अणदूर - नळदुर्ग ( मैलारपूर ) येथील श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी बालाजी मोकाशे, उपाध्यक्षपदी अविनाश मोकाशे यांची नव्याने तर सचिवपदी सुनील ढेपे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. अणदूर - नळदुर्ग ( मैलारपूर ) येथील श्री  खंडोबा हे जागृत देवस्थान असून, श्री खंडोबा - बाणाई विवाहस्थळामुळे राज्यात प्रसिद्ध आहे.  श्री खंडोबाच्या दर्शनासाठी  महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश . तेलंगणा येथील हजारो भाविक दर्शनासाठी...

स्वर्गाची सुंदरी, नवरी नटली नंतर राहुल शिंदेचं आलं अणदूर - नळदुर्गच्या खंडोबावर लोकप्रिय गाणं

उस्मानाबाद  - स्वर्गाची सुंदरी, नवरी नटली , पुण्याचा राघू आदी लोकप्रिय गाणे गाणाऱ्या गायक राहुल शिंदे यांचं  खंडोबावर नवीन दमदार गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे. तुळजापूर तालुक्यातील अणदूर आणि नळदुर्गच्या  श्री खंडोबा आख्यायिकेवर पत्रकार सुनील ढेपे यांनी  हे गाणं लिहिले आहे. अणदूर आणि नळदुर्ग हे दोन वेगवेगळे गावे असली तरी श्री खंडोबाची मूर्ती एकच आहे. अणदूर येथे सव्वा दहा महिने आणि नळदुर्ग येथे पावणे दोन महिने श्री खंडोबाचे वास्तव असते. श्री खंडोबा आणि बाणाई यांचा विवाह याच...

अणदूर - नळदुर्गचे खंडोबा मंदिर दर रविवारी बंद

अणदूर - तुळजापूर तालुक्यातील अणदूर - नळदुर्गचे श्री खंडोबा  मंदिर यापुढे  दर रविवारी बंद राहणार आहे. प्रशासनाच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून, भाविकांनी पुढील आदेश येईपर्यंत रविवारी दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन  मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे. कोरोना रुग्णाची संख्या वाढल्यामुळे  उस्मानाबाद जिल्ह्यात दर रविवारी जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसेच दर रविवारी मंदिरे आणि  प्रार्थनास्थळेही  बंद राहणार आहेत, प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत अणदूर...

कोरोनाचा फटका : नळदुर्गच्या श्री खंडोबाची महायात्रा रद्द

नळदुर्ग : अणदूर पाठोपाठ नळदुर्गच्या श्री खंडोबा यात्रेला कोरोना महामारीचा फटका बसला आहे. २७ ते २९ जानेवारी रोजी भरणारी महायात्रा रद्द करण्यात आली आहे. या तिन्ही दिवशी मंदिर परिसरात संचारबंदी लागू करण्यात येणार  आहे, मात्र प्रमुख मानकरी आणि पुजारी यांच्या उपस्थितीमध्ये सर्व धार्मिक विधी पार पडणार आहेत.  मैलारपूर ( नळदुर्ग ) येथील श्री खंडोबा असंख्य लोकांचे कुलदैवत आहे. त्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यातून किमान पाच ते सात लाख भाविक यात्रेसाठी हजेरी लावत असतात....

Page 1 of 1112345Next